प्रॉपर्टीच्या वादातून बहिणीला मारहाण

पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – वडिलांच्या घरी आलेल्या बहिणीला शिवीगाळ करत दगडाने मारून जखमी केले. ही घटना विद्यानगर, चिंचवड येथे ५ जुलै रोजी घडली.
पल्लवी दत्ता भोसले (वय ३५), दत्ता दिगंबर भोसले (वय ४०, दोघे रा. विद्यानगर, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मनीषा भारत जाधव (वय ४४, रा. गंजपेठ, पुणे) यांनी सोमवारी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वडिलांच्या घरी आल्या असता, तेथे राहणारी त्यांची बहीण आणि तिच्या पतीने प्रॉपर्टीच्या वादातून “तू इथे का आलीस” असे म्हणत फिर्यादीला मारहाण केली. तसेच घरासमोर पडलेला दगड मारून फिर्यादीच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत केली व धमकीही दिली. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *