शहीद दिनाच्या सभेत ममता बॅनर्जींचा बंडखोर नेते आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल

कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या शहीद दिनानिमित्त आयोजित सभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पक्षातील बंडखोर नेते आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. “फक्त साइनबोर्ड लावल्याने कोणी खरी तृणमूल काँग्रेस होत नाही. खरी तृणमूल काँग्रेस आम्हीच आहोत,” असे ठामपणे सांगत त्यांनी “असली तृणमूल काँग्रेस जिंदाबाद, देश बचाओ… बंगाल बचाओ” अशा घोषणा दिल्या.

निवडणुकीपूर्वी काही जणांनी “सेटिंग” केली होती, मात्र आता हळूहळू सर्व गोष्टी जनतेसमोर येत असल्याचा दावा त्यांनी केला. पक्षाशी विश्वासघात करणाऱ्यांवर निशाणा साधताना, तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या सर्व नेत्यांना पुन्हा पक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले असून, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *