नवी दिल्ली : संसदेबाहेर काल झालेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनावर भाजप खासदार कंगना रणौत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलनादरम्यान संसदेतील खासदारांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी दिल्ली पोलिसांचे कौतुक केले.
कंगना रणौत म्हणाल्या, “काल संसदेमध्ये सर्व खासदार उपस्थित होते. बाहेर सुरू असलेल्या आंदोलनामुळे आम्ही सर्वजण घाबरलो होतो. आंदोलकांची गर्दी आमच्यावर हल्ला करू शकते, अशी भीती वाटत होती.”
त्या पुढे म्हणाल्या, “दिल्ली पोलिसांनी ढालीप्रमाणे आमचे संरक्षण केले. त्यांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली आणि कोणालाही कोणतीही इजा होऊ दिली नाही. त्यासाठी मी दिल्ली पोलिसांचे मनापासून कौतुक करते.”
संसद मार्चदरम्यान झालेल्या आंदोलनानंतर राजकीय वातावरण तापले असून, विविध पक्षांच्या नेत्यांकडून या घटनेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
