पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – बँक ऑफ महाराष्ट्रचे खाते सायबर फसवणुकीच्या कामासाठी वापरून रक्कम चेकद्वारे काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना २६ सप्टेंबर २०२५ ते २९ जून २०२६ या कालावधीत संत तुकारामनगर, पिंपरी येथे घडली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संकेत नवले यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जोन्नी हेनरी पॉवेल (५३, वल्लभनगर, संत तुकारामनगर, पिंपरी) आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या बँकेच्या खात्याचा वापर संघटित सायबर गुन्हेगारांशी संगणमत करून फसवणुकीच्या व्यवहारांसाठी केला. आंध्र प्रदेशातील एका तक्रारदाराचे ४ लाख रुपये या खात्यात जमा करून ते आरोपीने चेकद्वारे काढून घेतले. संत तुकारामनगर पोलीस तपास करीत आहेत.
सायबर गुन्ह्यांसाठी बँक खात्याचा वापर
