Delhi-आंदोलनस्थळी जाऊ शकला नाही, पण पाठवले १५० पिझ्झा! नागालँडच्या तरुणाच्या कृतीची देशभर चर्चा
नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असतानाच नागालँडमधील एका तरुणाने दाखवलेल्या संवेदनशीलतेची देशभर चर्चा होत आहे. आंदोलनस्थळी प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही, तरी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी त्याने थेट १५० पिझ्झा जंतर-मंतरवर पाठवत आंदोलनकर्त्यांना अनोखा पाठिंबा दिला.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्याच्या या आगळ्यावेगळ्या कृतीची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून, अनेकांनी त्या तरुणाच्या संवेदनशीलतेचे आणि सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले आहे.
सध्या नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट असून, विद्यार्थ्यांकडून शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. अशा परिस्थितीत नागालँडमधील या तरुणाने दिलेला हा वेगळा पाठिंबा आंदोलनकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.