Delhi-“आजच्या तरुणांना आदेश नव्हे, संवाद हवा”; मोहन भागवत यांचे युवा पिढीबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी आजच्या युवा पिढीच्या बदलत्या विचारसरणीवर भाष्य करताना महत्त्वपूर्ण विधान केले आहे. जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असतानाच त्यांनी सांगितले की, आजची नवी पिढी केवळ आदेश पाळत नाही, तर प्रत्येक गोष्टीमागील तर्क आणि कारण जाणून घेऊ इच्छिते.
मोहन भागवत म्हणाले की, आजच्या तरुणांशी संवाद साधताना त्यांच्यावर विचार लादण्यापेक्षा त्यांच्याशी चर्चा करणे अधिक आवश्यक आहे. त्यांच्यासोबत आपुलकीचे नाते निर्माण करणे, त्यांचे प्रश्न समजून घेणे आणि स्वतःच्या आचरणातून योग्य उदाहरण घालून देणे, ही काळाची गरज आहे.
ते पुढे म्हणाले की, “आज डिक्टेशनची नाही, तर डिस्कशनची गरज आहे.” बदलत्या सामाजिक आणि शैक्षणिक वातावरणात तरुणांना समजून घेऊन त्यांच्यासोबत विश्वासाचे नाते निर्माण करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या वक्तव्याची देशभरात चर्चा होत असून, युवा पिढीशी संवादाच्या नव्या दृष्टिकोनाकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे.