Mumbai-मुंबईत अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; जिमी बॉयशी संबंधित बेकरीसह पाच बेकऱ्यांचे परवाने निलंबित
मुंबई : अन्नसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मुंबईतील मोठी कारवाई करत जिमी बॉयशी संबंधित बिम्बो ब्रिस्टल बेकरीसह पाच बेकऱ्यांचे परवाने निलंबित केले आहेत. तसेच वैध परवान्याविना व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या आणखी चार बेकऱ्यांना ‘स्टॉप बिझनेस’ नोटीस बजावण्यात आली आहे.
एफडीएच्या तपासणीदरम्यान बेकऱ्यांमधील ओव्हन आणि फ्रीजरमध्ये झुरळांचा वावर, स्वयंपाकघरात कीटकांचा प्रादुर्भाव, अस्वच्छता आणि अन्नसुरक्षा मानकांचे गंभीर उल्लंघन आढळून आले. या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व आस्थापनांना तातडीने व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
एफडीएने स्पष्ट केले की, ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार आहे.