पटनातील मॉलमधून तेज प्रताप यादव पोलिसांच्या ताब्यात; दिवसभरात दुसऱ्यांदा कारवाई
पटना : जनशक्ती जनता दल (JJD)चे प्रमुख तेज प्रताप यादव यांना शनिवारी (२५ जुलै २०२६) सायंकाळी पटना पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले. याआधी दुपारी आंदोलनादरम्यान त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती.
सायंकाळी तेज प्रताप यादव पटना येथील एका मॉलमध्ये असताना पोलिसांनी त्यांना पुन्हा ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान पटना शहराच्या सिटी एसपींसह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी त्यांना थेट पोलिसांच्या वाहनातून घेऊन गेल्याचे समोर आले आहे.
तेज प्रताप यादव यांना नेमक्या कोणत्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या कारवाईमुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, पोलिसांकडून अधिकृत स्पष्टीकरणाची प्रतीक्षा आहे.