Mumbai-धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सोनाक्षी सिन्हांची प्रतिक्रिया; “देशाच्या Gen-Z ला सलाम”
मुंबई : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाविरोधातील विद्यार्थी आंदोलनाला सुरुवातीपासून पाठिंबा देणाऱ्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत त्यांनी देशातील तरुणांच्या एकजुटीचे कौतुक करत त्यांना सलाम केला.
व्हिडिओमध्ये सोनाक्षी सिन्हा म्हणाल्या, “तुम्हाला माहिती नाही, आज तुम्ही काय करून दाखवलं आहे. मी एक कलाकार आहे, पण Gen-Z ही एक ताकद आहे. मी आधी Gen-Z ला फार हलक्यात घेत होते. चार तास काम करून थकतात, त्यांच्याकडून काही होणार नाही, असं वाटायचं. पण त्या विचारासाठी मी माफी मागते.”
त्यांनी पुढे, “देशाच्या Gen-Z ला सलाम. आता मलाही Gen-Z सारखं व्हावंसं वाटतं,” असे म्हणत युवकांच्या संघर्षाचे कौतुक केले.
सोनाक्षी सिन्हा यांच्या या प्रतिक्रियेनंतर त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, विद्यार्थी आंदोलनाला दिलेल्या त्यांच्या पाठिंब्याचीही चर्चा रंगली आहे.