जाब विचारल्याच्या रागातून तरुणाला काठीने मारहाण
पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – शिवीगाळीचा जाब विचारल्याच्या कारणावरून तरुणाला लाकडी काठीने डोक्यात मारहाण केली. ही घटना 25 जुलै रोजी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास मारुंजी येथील रॅम्बो पीजीजवळ रस्त्यावर घडली.
आकाश सतिश सुरवसे (वय 21, रा. डांगे चौक, थेरगाव), विष्णुकांत दयानंद अंधारे (वय 25, रा. शिंदेवस्ती, मारुंजी, मुळशी) अशी अटक आरोपींची नावे आहे. रोशन सचिन गायकवाड (वय 21, रा. रॅम्बो पीजी, शिंदेवस्ती, मारुंजी; मूळ रा. लोंढा, सटाणा, जि. नाशिक) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आपल्या मित्राशी फोनवर बोलत असताना आरोपींनी काहीही कारण नसताना त्यांना शिवीगाळ केली. मला शिवी का दिली? अशी विचारणा फिर्यादीने केली असता, त्याचा राग मनात धरून आरोपी आकाश सुरवसे याने लाकडी काठीने फिर्यादीच्या डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच दुसरा आरोपी विष्णुकांत अंधारे याने हाताने मारहाण करत शिवीगाळ केली. पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.