रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी चोरीला
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना २२ जुलै रोजी दुपारी १:३० ते ४:०० च्या दरम्यान तळेगाव दाभाडे येथील मराठा क्रांती चौकाजवळ घडली.
या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. बालाजी आचितराव राऊत (वय ४०, रा. श्री श्रेयस अपार्टमेंट, तळेगाव दाभाडे) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची २० हजार रुपये किमतीची होंडा ॲक्टिव्हा (MH 14 GV 2791) ड्रीम लंच होमच्या बाजूला पार्क केली होती. अज्ञात चोरट्यासने ती चोरून नेली. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहे.