Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

Pimpri-Chinchwad-अंमलीपदार्थ मुक्‍त शहरासाठी पोलिसांचा डिजिटल संवाद ४५ हजार नागरिकांचा सहभाग

By Sumedh Chapalgaonkar
July 28, 2026 1 Min Read
0

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘अंमलीपदार्थमुक्त महाराष्ट्र’ अभियानाला अधिक प्रभावी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने डिजिटल माध्यमातून अभिनव उपक्रम राबविला. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी ‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आयोजित ‘व्हर्च्युअल टाऊन हॉल’च्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधत अंमली पदार्थांविरोधात जनजागृती केली. या उपक्रमाला तब्बल ४५ हजार नागरिक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मंगळवारी सकाळी ११ ते १२.३० या वेळेत झालेल्या या ऑनलाइन संवादात शहरातील ८१९ शाळा, महाविद्यालये, औद्योगिक समूह, गृहनिर्माण संस्था, डॉक्टर व मेडिकल असोसिएशन, हॉटेल व्यावसायिक आणि विविध स्वयंसेवी संस्थांतील नागरिक सहभागी झाले होते.
संवादादरम्यान अंमली पदार्थांचे वाढते दुष्परिणाम, तरुणांमध्ये वाढणारे व्यसन, प्रतिबंधात्मक उपाययोजना, कायदेशीर कारवाई आणि संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांपर्यंत कशी पोहोचवावी, याबाबत नागरिकांनी विविध प्रश्न उपस्थित केले. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर देत अंमली पदार्थांविरोधातील लढ्यात नागरिकांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी अंमली पदार्थांशी संबंधित माहिती देण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने सुरू केलेल्या अँटी नार्कोटिक्स हेल्पलाइन क्रमांक ७७९८१००११२ चा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती निर्भीडपणे पोलिसांना द्यावी, असेही सांगण्यात आले.
या उपक्रमाला पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, सर्व पोलीस उपायुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि अधिकारी उपस्थित होते.
डिजिटल माध्यमाचा प्रभावी वापर करून नागरिकांना थेट सहभागी करून घेणाऱ्या या उपक्रमामुळे अंमली पदार्थांविरोधातील जनजागृतीला नवे बळ मिळाले आहे. समाज आणि पोलीस यांच्या संयुक्त सहभागातूनच ‘अंमलीपदार्थमुक्त पिंपरी-चिंचवड’ हे उद्दिष्ट साध्य होईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Tags:

000 citizens participate.Pimpri-Chinchwad: Police engage in digital dialogue for a drug-free city; 45
Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या ८४४ वाहनचालकांवर कारवाई प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केला आठ लाख ४४ हजारांचा दंड

Next

आयुष्मान भारत कार्ड मोहिमेवर वितरीत करा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • पिंपरीगावातून मध्यरात्री गायीची चोरी; तिघा चोरट्यांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद वैभवनगर परिसरातील घटना; २० हजारांची गाय लंपास, पिंपरी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
  • आयुष्मान भारत कार्ड मोहिमेवर वितरीत करा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश
  • Pimpri-Chinchwad-अंमलीपदार्थ मुक्‍त शहरासाठी पोलिसांचा डिजिटल संवाद ४५ हजार नागरिकांचा सहभाग
  • एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या ८४४ वाहनचालकांवर कारवाई प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केला आठ लाख ४४ हजारांचा दंड
  • रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी चोरीला

CATEGORIES

  • Uncategorized (476)
  • क्राईम (261)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (900)
  • पुणे (138)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • पिंपरीगावातून मध्यरात्री गायीची चोरी; तिघा चोरट्यांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद वैभवनगर परिसरातील घटना; २० हजारांची गाय लंपास, पिंपरी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
  • आयुष्मान भारत कार्ड मोहिमेवर वितरीत करा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश
  • Pimpri-Chinchwad-अंमलीपदार्थ मुक्‍त शहरासाठी पोलिसांचा डिजिटल संवाद ४५ हजार नागरिकांचा सहभाग
July 28, 2026

पिंपरीगावातून मध्यरात्री गायीची चोरी; तिघा चोरट्यांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद वैभवनगर परिसरातील घटना; २० हजारांची गाय लंपास, पिंपरी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड : पिंपरीगावातील वैभवनगर परिसरातून मध्यरात्री तीन अज्ञात चोरट्यांनी रस्त्यावरून गाय चोरून नेल्याची घटना उघडकीस...

Read More
July 28, 2026
July 28, 2026

आयुष्मान भारत कार्ड मोहिमेवर वितरीत करा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश

Sumedh Chapalgaonkar

​पुणे : जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार व मोफत आरोग्य सुविधा मिळण्यासाठी ‘आयुष्मान भारत कार्ड’ मोहीम...

Read More
July 28, 2026
July 28, 2026

Pimpri-Chinchwad-अंमलीपदार्थ मुक्‍त शहरासाठी पोलिसांचा डिजिटल संवाद ४५ हजार नागरिकांचा सहभाग

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘अंमलीपदार्थमुक्त महाराष्ट्र’ अभियानाला अधिक प्रभावी करण्यासाठी...

Read More
July 28, 2026
July 28, 2026

एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या ८४४ वाहनचालकांवर कारवाई प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केला आठ लाख ४४ हजारांचा दंड

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – उच्च सुरक्षा क्रमांक पट्टी (एचएसआरपी) नसलेल्या वाहनांवर पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन...

Read More
July 28, 2026
July 28, 2026

रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी चोरीला

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना...

Read More
July 28, 2026
July 28, 2026

चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; ज्‍येष्‍ठाला अटक

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – १० वर्षांच्या चिमुकलीवर वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. ही घटना...

Read More
July 28, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme