तडीपार गुंडाला लोखंडी कोयत्यासह अटक
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या गुंडाला कोयत्यासह अटक केली. ही कारवाई 28 जुलै रोजी सायंकाळी जुनी सांगवी येथे करण्यात आली.
पोलीस हवालदार शैलेश गुलाब मगर यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अक्षय दशरथ शिंदे (वय 23, रा. वैदू वस्ती, पिंपळे गुरव) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला पुणे जिल्हा व पिंपरी-चिंचवड हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. तडीपारीचा आणि शस्त्रबंदीचा आदेश मोडून तो जवळ बेकायदेशीर कोयता बाळगून फिरत असताना पकडला गेला. सांगवी पोलीस पुढील तपास करत आहेत.