गाडी लावण्यावरून तरुणाला विटेने मारहाण
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – घरासमोर दुचाकी पार्क करण्याच्या क्षुल्लक कारणावरून शेजार्याने तरुणाला शिवीगाळ करत विटा फेकून मारहाण केली. ही घटना पिंपरी येथे 20 जुलै रोजी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास घडली.
पवन पुरुषोत्तम गिडवाणी (वय 22, रा. सत्यनारायण मंदिराजवळ, पिंपरी) यांनी मंगळवारी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अशोक परमानंद धणवाणी (वय 55, रा. सत्यनारायण मंदिराजवळ, पिंपरी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या वडिलांनी अॅक्टिव्हा गाडी उभी केल्याच्या कारणावरून आरोपीने शिवीगाळ केली. तसेच रस्त्यावरील विट फेकून मारल्याने फिर्यादीच्या डोक्याला दुखापत झाली. पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहेत.