अमली पदार्थ बाळगणार्या तरुणावर गुन्हा
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – गहूंजे गावच्या हद्दीत बेकायदेशीरपणे अमली पदार्थांची विक्री करणार्या एका आरोपीला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई 28 जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास करण्यात आली.
पोलीस हवालदार सचिन बबनराव काचोळे यांनी शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी अरबाज बशीर शेख (वय 28) आणि सलमान बशीर शेख (दोघेही रा. गहूंजे, मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या ताब्यातून 18 हजार 314 रुपये किमतीचा गांजा आणि पाच हजार रुपयांचा मोबाइल असा एकूण 23 हजार 314 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिरगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.