घरासमोरून 45 हजारांची बुलेट चोरीला
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – घरासमोर पार्क केलेली 45 हजार रुपये किमतीची बुलेट अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही चोरी 22 जून ते 2 जुलै दरम्यानच्या काळात मुळशी तालुक्यातील म्हाळुंगे येथे घडली आहे.
शहाजी नामदेव वाघमारे (वय 52, रा. अनिकेत कोळेकर चाळ, महाळुंगे, ता. मुळशी) यांनी मंगळवारी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आपली काळ्या रंगाची बुलेट राहत्या घरासमोर लॉक करून पार्क केली होती. चोरट्याने ती लबाडीच्या इराद्याने चोरून नेली. बावधन पोलीस या चोरीचा अधिक तपास करत आहेत.