नांदेडच्या तरुणीची सिंहगडावरून उडी मारून आत्महत्या

नांदेड येथील तरुणी (सध्या राहणार बीजली नगर चिंचवड) मनिषा धर्मदास गायकवाड( वय 28) हि 28 एप्रिल पासून बेपत्ता होती, 29 एप्रिल रोजी सिंहगडावर तिचा मोबाईल आणि अन्य वस्तू सापडल्याने हवेली पोलिस स्टेशन मध्ये ,ती बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली , त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीम कडून रात्री दोन वाजेपर्यंत तिचा शोध घेण्यात आला, त्यानंतर शोधकार्य थांबवून दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तिचा शोध घेण्यात आला असता तूप खान्या जवळच्या बुरुजावरुन तिने उडी मारल्याचे निदर्शनास आले, त्यानंतर वनविभाग व अग्निशामक दलाच्या सहाय्याने आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीम ने 30 एप्रिल रोजी तिचा मृतदेह वर आणून प्रशासनाच्या ताब्यात दिला .आत्महत्येच कारण अस्पष्ट असून, हवेली पोलिस अधिक तपास करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *