Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Uncategorized

मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंक बोगद्यात धावत्या कारवर दगड कोसळला; कारची काच फुटली, सुदैवाने जीवितहानी टळली

By Sumedh Chapalgaonkar
June 30, 2026 1 Min Read
0

लोणावळा : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील कनेक्टिंग लिंक बोगद्यात धावत्या कारवर दगड पडल्याने कारची काच फुटून अपघात झाल्याची घटना आज (२९ जून) सायंकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सोमवार, दिनांक २९ जून २०२६ रोजी सायंकाळी ५:१७ वाजेच्या सुमारास मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंक बोगदा क्रमांक दोनमध्ये (किमी १०/४००, पुणे बाजू) हा अपघात झाला. उचप्पा खतनाप्पा वरचल्ली (वय ५३ वर्ष, रा. खोपोली, जि. रायगड, धंदा- ट्रान्सपोर्ट) हे आपल्या ताब्यातील अर्टिगा कार (क्रमांक MH 46 CM 1989) घेऊन पुण्याच्या दिशेने जात होते. कार बोगद्यातून जात असताना अचानक गाडीच्या समोरील काचेवर दगड पडला. दगड पडल्याच्या आघातामुळे कारची काच जागीच फुटली.
या घटनेची माहिती सोशल मीडिया ग्रुपच्या माध्यमातून सायंकाळी ६:३० वाजता खंडाळा महामार्ग पोलीस केंद्राला मिळाली. माहिती मिळताच खंडाळा महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) समीर कटपाळे आणि एम.एस.एफ (MSF) जवान सुरेश ढेरे यांनी सायंकाळी ६:४० वाजता तातडीने अपघातस्थळी भेट दिली.
हा अपघात केवळ वाहनाचे नुकसान करणारा (विना दुखापत) ठरला असून, सुदैवाने कार चालकासह इतर कोणीही जखमी झालेले नाही. अपघातानंतर कार चालक आपल्या वाहनासह पुढील प्रवासासाठी निघून गेले आहेत. कार चालक अपघातस्थळावरून कोणतीही तक्रार किंवा नोंद न करता निघून गेल्यामुळे, शासकीय नियमानुसार ‘E-DAR’ आणि ‘PM rahat’ पोर्टलवर या अपघाताची माहिती भरण्यात आलेली नाही, अशी माहिती खंडाळा महामार्ग पोलीस केंद्राचे पी.एस.आय. समीर कटपाळे यांनी दिली आहे.

Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

नसरापूर प्रकरणात चिमुकलीला न्याय; तपास अधिकारी विजयमाला पवार आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक

Next

​कुदळवाडीत पुन्हा भंगाराच्या दुकानाला भीषण आग महापालिकेची लाखो रुपयांची कारवाई ठरली निष्फळ

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme