​कुदळवाडीत पुन्हा भंगाराच्या दुकानाला भीषण आग महापालिकेची लाखो रुपयांची कारवाई ठरली निष्फळ

पिंपरी-चिंचवड :
चिखली कुदळवाडी परिसरामधील एका भंगाराच्या दुकानाला सोमवारी रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाचे सहा बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करत सुमारे तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणली सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणीही जखमी झालेले नाही मात्र आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही

​विशेष म्हणजे गेल्या पंधरा दिवसांतील कुदळवाडी परिसरातील भंगाराच्या गोदामाला लागलेली ही दुसरी आग आहे काही महिन्यांपूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेने मोठा गाजावाजा करत आणि लाखो रुपयांचा खर्च करत कुदळवाडी परिसरातील सर्व अनधिकृत भंगाराची दुकाने पाडून टाकली होती महापालिकेच्या या धडक कारवाईनंतरही या भागात पुन्हा एकदा भंगाराची गोदामे बेधडकपणे उभी राहिली असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकून पुन्हा उभी राहिलेली ही गोदामे आणि लागणाऱ्या आगींमुळे महापालिकेने लाखो रुपये खर्च करून केलेली ती कारवाई पूर्णपणे निष्फळ ठरल्याची जोरदार चर्चा आता पिंपरी चिंचवड शहरात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *