हॉर्न वाजवल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने हल्ला

पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – रस्त्यात उभे असलेल्या टोळक्याला बाजूला होण्यासाठी हॉर्न वाजवल्याचा राग आल्याने चौघांनी मिळून एका तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवार (दि. १५ एप्रिल) रोजी रात्री ७:३० वाजण्याच्या सुमारास टॉवर लाईन, चिखली येथे घडली.
या प्रकरणात आर्यन राजाराम चव्हाण (वय २०, रा. श्रीराम कॉलनी, मोरेवस्‍ती, चिखली) असे जखमी तरुणाचे नाव असून त्‍यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. १७ एप्रिल) रोजी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अल्‍पवयीन मुलांच्‍या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना त्यांनी रस्त्यात थांबलेल्या मुलांना हॉर्न वाजवून बाजूला होण्यास सांगितले. याचा राग येऊन आरोपींनी “आम्ही या भागातील भाई आहोत” असे म्हणत फिर्यादीला पकडून ठेवले आणि त्यांच्या डोक्यावर व हातावर कोयत्याने वार केले. तसेच परिसरात कोयता फिरवून दहशत निर्माण केली. चिखली पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *