पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – औंध जिल्हा रुग्णालयाजवळ गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. १५ एप्रिल) रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जुनी सांगवी येथील पॉवर हाऊसजवळ करण्यात आली.
या प्रकरणात सहाय्यक उपनिरीक्षक निशांत काळे यांनी गुरुवारी (दि. १७ एप्रिल) रोजी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश कैलास चव्हाण (वय ३०, रा. गणेगाव खलसा, ता. शिरूर
जि. पुणे) याला अटक केली आहे. तसेच विनोद ज्ञानेश्वर झरे (राहू पाटेठाण, दौंड) याच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश चव्हाण याच्याकडून ७ लाख ९० हजार रुपये किमतीचा १४ किलो गांजा, एक मोटारसायकल आणि दोन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. हा गांजा त्याने विनोद झरे याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे तपासात समोर आले आहे. सांगवी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
सांगवी परिसरात १४ किलो गांजासह एकाला अटक
