Delhi-जंतर-मंतर आंदोलनादरम्यान उमर खालिदवरील वक्तव्यामुळे अभिजीत दिपके चर्चेत; सोशल मीडियावर रंगली चर्चा

नवी दिल्ली(delhi) : जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सीजेपी (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी तुरुंगात असलेल्या कार्यकर्ते उमर खालिद यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर नव्या चर्चांना उधाण आले आहे.

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात बोलताना दिपके यांनी, “मी उमर खालिद किंवा मुस्लिम असतो, तर आतापर्यंत तुरुंगात असतो,” असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, समर्थक आणि विरोधकांमध्ये तीव्र चर्चा सुरू झाली आहे.

दिपके यांच्या वक्तव्यावर अनेकांनी समर्थन व्यक्त केले, तर काहींनी त्यावर आक्षेप घेत टीकाही केली. त्यामुळे हा विषय सोशल मीडियावर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *