तरुणाच्‍या खून प्रकरणी आरोपीस अटक

​पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – दारू पिताना झालेल्‍या भांडणानंतर एका तरुणाचा डोक्यात वार करून आणि हात- पाय-कंबर वायरने बांधून विहिरीत फेकून देत खून केला. ही घटना २२ जुलै रोजी सकाळी ११:०० वाजण्यापूर्वी मुळशी तालुक्यातील नेरे येथील मेमाणे वस्तीत घडली.
सुमन पात्रा (मूळ रा. सिमुलताला, नाडीया, पश्चिम बंगाल) असे खून झालेल्‍या तरुणाचे नाव आहे. संतू ऊर्फ विशाल बासूदेव मांजी (वय २२, रा. चुर्णीपोता, जि. नादीया, पश्चिम बंगाल) यास पोलिसांनी अटक केली आहे. रामदास पांडुरंग मेमाणे (वय ६३, रा. नेरे, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेरे येथील बांधकाम साइटवर राहणारा सुमन पात्रा याची आरोपी मांजी याच्‍यासोबत दारू पिताना भांडण झाले. भांडणाच्‍या या रागातून आरोपी मांजी याने सुमन पात्रा याच्या डाव्या कानाच्या वर डोक्यात व कपाळावर मारहाण केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने किंवा जीवाने मारण्यासाठी त्याच्या हातापायाला व कमरेला वायर बांधून त्याला विहिरीत फेकून देऊन त्याची हत्या करण्यात आली. पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *