भरधाव ट्रेलर्स पलटी होऊन चालक जखमी

​पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – भरधाव वेगात चालवलेला ट्रेलर पलटी होऊन झालेल्‍या अपघातामध्ये केबिन तुटून नुकसान झाले. तसेच चालक किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना २२ जुलै रोजी रात्री ०२.३० वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे मंगरुळ रोडवर सीकोम सेल्स अँड इंजिनिअरिंग कंपनीजवळ घडली.
​नितीन सुभाषराव गवळी (वय ४२, सध्या रा. महात्मा फुलेनगर, दापोडी; मूळगाव चिकर्डी, ता. जि. लातूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस शिपाई बापूराव ज्ञानदेव परभाने (वय ४६) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नितीन गवळी हा आपल्या ताब्यातील ट्रेलर अविचाराने, हयगयीने आणि भरधाव वेगाने रोडच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवत होता. रस्त्यावर ट्रेलर अचानक पलटी झाल्याने केबिन तुटून, चेपून समोरील काच फुटली, तसेच मागे ठेवलेल्या दोन लोखंडी कॉईल खाली पडून पॅकिंगचे नुकसान झाले. या अपघातात चालकाच्या डाव्या मनगटाला, कपाळाला आणि उजव्या पायाला मुका मार लागून तो किरकोळ जखमी झाला आहे. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *