पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – थेरगाव येथील डांगे चौकातील सार्वजनिक शौचालयासमोरील फुटपाथवर स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ‘चिमणी पाखरू’ नावाचा जुगार खेळणाऱ्या आणि खेळवणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. १२ जून) रोजी सायंकाळी ५.३० वाजता करण्यात आली.
राणी माधव पवार (वय ४०, रा. काळेवाडी फाटा) आणि रेशमा मिथुन आटोटे (वय ३४, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस शिपाई सुखदेव सूर्यभान गावंडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डांगे चौकातील फुटपाथवर महिला आरोपी स्वतःच्या फायद्यासाठी जुगार खेळत असताना पोलिसांनी छापा टाकला. त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण तीन हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.
’चिमणी पाखरू’ जुगार खेळणाऱ्या दोन महिलांवर पोलिसांची कारवाई
