गावठी हातभट्टीची दारू विकणाऱ्या तिघांवर कारवाई

पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – घराच्या आडोशाला बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू चोरून विक्री करणाऱ्या एका महिला आरोपीसह तिच्या साथीदारांवर गुन्‍हा दाखल केला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या दारूबंदी पथकाने दि. १९ जून रोजी दुपारी सव्‍वादोन वाजताच्‍या सुमारास खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथील संतोषकडूनगर भागात करण्‍यात आली आहे.
अंजनी आस्मानतारा रजपूत (वय २४, रा. वाकड), प्रियंका प्रद्युम्न रजपूत व प्रद्युम्न विठ्ठल रजपूत (दोघे रा. वाकी बुद्रुक, खेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अमोल सर्जेराव शिरसाट (वय ३३) यांनी उत्‍तर चाकण पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आरोपी ही स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सात हजार ८० रुपये किमतीची गावठी हातभट्टीची तयार दारू विनापरवाना चोरून विक्री करत असताना मिळून आली. उत्तर चाकण पोलीस पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *