अश्लील चाळे करणाऱ्या महिलेवर कारवाई

पिंपरी, दि. 3 (प्रतिनिधी) – दिघी-आळंदी रोडवर सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करून आणि येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण करून सार्वजनिक सभ्यतेचा भंग करणाऱ्या एका महिलेवर दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. २ मे) रोजी दुपारी साडेतीन वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली आहे.
​याप्रकरणी पोलीस शिपाई सोमनाथ बाळू खळसोडे (वय ३५) यांनी शनिवारी (दि. २ मे) रोजी दिघी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका महिला आरोपीवर अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ मे २०२६ रोजी दुपारी ३:३० च्या सुमारास वडमुखवाडी येथील गंधर्व लॉजसमोरील सार्वजनिक रस्त्यावर ही घटना घडली. आरोपी महिलेने फिर्यादी व इतर पुरुषांना पाहून अश्लील हावभाव केले, अश्लील शब्द उच्चारले आणि फिर्यादीच्या अंगावरून हात फिरवून सार्वजनिक सभ्यतेचा भंग होईल असे वर्तन केले. यामुळे परिसरातून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना नाहक त्रास व अडथळा निर्माण झाला. या घटनेचा तपास दिघी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *