पिंपरी, दि. 3 (प्रतिनिधी) – मुळशी तालुक्यातील कासारसाई येथे एका खासगी प्लॉटमधील १ लाख २५ हजार रुपये किमतीचा लोखंडी ऑफिस कंटेनर जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना १० ऑगस्ट २०२५ मध्ये सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली.
याप्रकरणी डॉ. पंकज पोपटराव येवले (वय ५३, रा. गंगाई निवास, अमृतवेल कॉलनी, रहाटणी) यांनी शनिवारी (दि. २ मे) रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आनंद लाटे, मधुकर बावकर, एक क्रेन चालक आणि क्रेनवरील कामगार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८:३० च्या सुमारास कासारसाई येथील सर्व्हे नं. १९/१ मध्ये घडली. आरोपींनी फिर्यादी यांच्या संमतीशिवाय त्यांच्या प्लॉटमध्ये प्रवेश केला. तिथे असलेली कंपाउंडची भिंत पाडून अतिक्रमण करण्याची धमकी दिली आणि फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यानंतर प्लॉटमध्ये असलेला १ लाख २५ हजार रुपयांचा लोखंडी ऑफिस कंटेनर क्रेनच्या साहाय्याने जबरदस्तीने चोरून नेला. या घटनेचा पुढील तपास हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक साळी करत आहेत.
कासारसाई येथे भिंत पाडून ऑफिस कंटेनरची चोरी
