अजित पवार विमान दुर्घटना प्रकरण; ब्लॅक बॉक्सचा डेटा १०० टक्के डाउनलोड, पुण्यतिथीपूर्वी तपास पूर्ण होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाच्या तपासाबाबत महत्त्वाची माहिती दिली. या तपासात अमेरिकेतील एजन्सी आणि परदेशातील तज्ज्ञ कार्यरत असून, विमानातील ब्लॅक बॉक्समधील १०० टक्के डेटा यशस्वीपणे डाउनलोड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या प्रकरणी केंद्र सरकारशी माझी चर्चा झाली आहे. अशा प्रकारच्या विमान अपघातांच्या तपासाला साधारणपणे तीन ते चार वर्षांचा कालावधी लागतो. मात्र, केंद्र सरकारने सीबीआयला हा तपास जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.”

अजित पवार यांच्या पुण्यतिथीपूर्वी या अपघाताचा संपूर्ण तपास पूर्ण करून अहवाल सादर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विधानसभेत दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *