पिंपरी-चिंचवड:
आळंदी परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार (Gangrape) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधमांनी केवळ अत्याचारच केला नाही, तर पीडितेच्या अन्नात किळसवाना प्रकार करून क्रूरतेचा कळस गाठला आहे.
नेमकी घटना काय?
पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ही घटना ७ एप्रिल २०२६ आणि त्यापूर्वी चार-पाच महिन्यांपूर्वी घडली आहे. संशयित आरोपींनी संगनमत करून पीडितेच्या घरात प्रवेश केला. ७ एप्रिल रोजी आरोपींनी पीडितेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने काढून घेतले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
क्रूरतेची परिसीमा: फिर्यादीच्या अन्नात किळसवाना प्रकार केला.
तक्रारीतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, चार-पाच महिन्यांपूर्वी जेव्हा हे आरोपी पीडितेच्या घरी आले होते, तेव्हा त्यांनी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. इतकेच नव्हे तर, पीडितेने खाण्यासाठी केलेल्या भाताच्या पातेल्यात एका आरोपीने किळसवाना प्रकार केला. या घृणास्पद प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
घर नावावर करण्यासाठी धमकावले
आरोपींनी केवळ शारीरिक अत्याचार केले नाहीत, तर पीडितेच्या मालमत्तेवरही डोळा ठेवला होता. “हे घर आमच्या नावावर कर, नाहीतर घर विकून आम्हाला पैसे दे. अन्यथा आम्ही तुला असाच त्रास देत राहू,” अशी धमकी देत आरोपींनी पीडितेला मानसिक छळ सोसण्यास भाग पाडले.
सोशल मीडियावर बदनामीचा प्रयत्न
काही दिवसांनंतर आरोपी पुन्हा पीडितेच्या घरी गेले होते, मात्र तिने दरवाजा उघडला नाही. याचा राग मनात धरून आरोपींनी तिला अश्लील शिवीगाळ केली आणि सोशल मीडियावर तिची बदनामी करणारा आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल:
दिघी पोलिसांनी याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यात एका महिलेचाही समावेश आहे. अभिमन्यू आंधळे
नारायण खंदारे
श्याम महाराज राठोड
राहुल सुरेश चोरडीया
कानीफनाथ गुलाबराव घुले
युवराज खरमाटे
आणि एक महिला आरोपी.
पुढील तपास:
पीडितेने २४ एप्रिल रोजी दिलेल्या फिर्यादीवरून दिघी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
