pune-शासकीय निवासी शाळेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे आवाहन

पुणे, दि. ७(pune) – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत कार्यान्वित असलेल्या पुणे जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची/ मुलींच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून जास्तीत जास्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी या शाळांमध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांसाठी असलेल्या दिवे (ता. पुरंदर), तरंगवाडी (ता. इंदापूर), पेठ (ता. आंबेगाव) तसेच मुलींसाठी चांडोली (ता. खेड) या ठिकाणी निवासी शाळेत इयत्ता ६ वी ते १० पर्यंत प्रवेश देण्यात येणार आहे.

या निवासी शाळेत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ८० टक्के, अनुसूचित जमातीसाठी १० टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी ५ टक्के, विशेष मागास प्रवर्गासाठी २ टक्के तर दिव्यांगासाठी ३ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत, असेही श्री.लोंढे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *