इंदोरीत एकाला लाकडी दांडक्याने मारहाण

पिंपरी, दि. ३० (प्रतिनिधी) – गाण्यांचा आवाज जास्त असल्याच्या कारणावरून शेजाऱ्याने वाद घालत एकाला लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना २८ जून रोजी रात्री नऊच्या सुमारास मावळ तालुक्यातील इंदोरी येथील ठाकरवस्ती येथे घडली.
दीपक गायकवाड आणि त्याची पत्नी (नाव माहीत नाही, रा. ठाकरवस्ती, इंदोरी, ता. मावळ, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महेश शंकर शिंदे (वय ३१, रा. ठाकरवस्ती, इंदोरी, ता. मावळ, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आपल्या कुटुंबासह जेवण करत असताना शेजारी राहणारा आरोपी दीपक तेथे आला. गाण्यांचा आवाज जास्त आल्याच्या कारणावरून त्याने वाद घालून फिर्यादीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. फिर्यादी यांच्‍या डोक्यात, कानावर व मानेवर मारहाण केली. फिर्यादीची पत्नी सोडवण्यास आली असता आरोपीच्या पत्नीने शिवीगाळ व दमदाटी केली. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *