पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – दुचाकीवरून विनापरवाना प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई दि. २५ जून २०२६ रोजी दुपारी च-होली खुर्द येथे करण्यात आली.
रामदास शंकरराव शिंदे (वय ३९, रा. च-होली खुर्द, ता. खेड, मूळ रा. नांदेड) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस कॉन्स्टेबल हरिराम तुळशीराम डुमनर (वय ३३) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्याच्या ताब्यातील दुचाकीवरून शासनाने प्रतिबंधित केलेला ८ हजार ३६० रुपये किमतीचा गुटखा पांढऱ्या गोणीत विक्रीसाठी घेऊन जात होता. पोलिसांनी गुटखा आणि २० हजार रुपयांची दुचाकी असा एकूण २८ हजार ३६० रुपयांचा माल जप्त केला. पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहे.
दुचाकीवरून प्रतिबंधित गुटखा जप्त
