​.गांजा बाळगणाऱ्या तरूणावर गुन्हा दाखल

​पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे गांजा बाळगणाऱ्या एका तरूणावर पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. ही कारवाई दि. २५ जून २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नाशिक फाटा उड्डाणपुलाखाली कासारवाडी येथे केली आहे.
सक्षम विवेक भोर (वय १८, रा. जवळकर चाळ, कासारवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस शिपाई संजोत सुधाकर ओहोळ (यांनी दापोडी पोलीस ठाण्‍यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी नाशिक फाट्या जवळील रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या पिशवीत १६ हजार ५५० रुपये किमतीचा एकूण ३३० ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ अनाधिकाराने व बेकायदेशीर रित्या जवळ बाळगताना मिळून आला आहे. पुढील तपास दापोडी पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *