मेव्हण्याकडून दाजीवर चाकूने जीवघेणा हल्ला

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – झोपेतून उठवून बहिणीशी भांडण करतो काय, असे म्हणत मेव्हण्याने साथीदारांसह आपल्‍याच दाजीवर चाकू वार करीत काठीने जीवघेणा हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि. २७ जून) पहाटे पावणेपाच वाजताच्या सुमारास नेरे येथे घडली.
रोहित तानाजी शेंडगे (वय ३४, रा. नेरे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विपुल संजय जानकर (वय २४, सांगली) आणि त्याच्यासोबत अन्य ३ व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी हे घरी झोपलेले असताना, त्यांचा मेव्हणा विपुल याने त्यांना झोपेतुन उठवून “माझ्या बहिणीशी भांडण करतो काय, तुला जिवंत सोडणार नाही” असे बोलून हातातील चाकूने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या पंजावर आणि सीटवर वार केले. त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या इसमाने तोच चाकू घेऊन फिर्यादीच्या दोन्ही पायांवर वार केले. तसेच अन्य दोघांनी प्लास्टिकच्या काठीने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादीस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *