पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – एका ड्रग्ज तस्कराला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून ६० ग्रॅम ब्राऊन शुगरसह एकूण १२.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई वाकड येथे २५ जून रोजी केली.
संदीप कुमार अजोधी प्रसाद (वय २७, रा. आंबेगाव, मूळ उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे. पोलीस शिपाई कारभारी नामदेव पालवे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने दुचाकीवरून ६० ग्रॅम ब्राऊन शुगर घेऊन चालला होता, तेव्हा वजनकाटा आणि रोख रकमेसह त्याला पकडले गेले. हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
वाकडमधून १२ लाखांची ‘ब्राऊन शुगर’ जप्त
