गांजा विकणारा तस्कर गजाआड

​पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – फुटपाथवरील टपरीमध्ये बेकायदेशीरपणे गांजा बाळगून विक्री करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई चिखली जाधववाडी येथे २६ जून रोजी करण्‍यात आली.
धनंजय अर्जुन गोरे (वय ४१, रा. जाधववाडी, चिखली, मूळ बीड) याच्‍याविरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार कॅठय्या गुरय्या स्वामी यांनी फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी टपरीमध्ये बेकायदेशीररित्या अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून १०,७५० रुपये किमतीचा २१५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. चिखली पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *