बाणेर येथे सव्वातीन लाखांची घरफोडी

पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – बाणेर येथील एका बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोराने सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह ३ लाख १४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना शनिवारी (दि. १३ जून) रोजी घडली.
प्राज संजय शेटे (वय २८, रा. मोहननगर, बाणेर, पुणे) यांनी रविवारी (दि. १४ जून) रोजी बावधन पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. अनिल मिस्त्री राजभर (वय ४०, रा. जौनपूर, उत्तर प्रदेश) या आरोपीला अटक केली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शनिवारी संध्याकाळी साडेचार ते साडेसात वाजताच्‍या दरम्‍यान घराबाहेर गेल्या होत्‍या. त्‍यावेळी आरोपीने त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील तीन लाख, सहा हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे टॉप्स, दोन मनगटी घड्याळे आणि आठ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. पुढील तपास बावधन पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *