पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) – गाडी पार्क करण्याच्या शुल्लक कारणावरून तीन जणांनी मिळून एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी आणि बेल्टने बेदम मारहाण केली. ही घटना ३ जुलै रोजी मध्यरात्री घडली.
प्रतीक शिंदे (वय २५), ऋत्विक क्षीरसागर (वय २४) आणि आकाश आडसुळ (वय २५, सर्व रा. पवनानगर, काळेवाडी) यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. अभिषेक मच्छिंद्र पांचाळ (वय २८, रा. रामनगर, रहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आपली होंडा शाईन गाडी मैदानात पार्क करत असताना आरोपींनी ‘इथे गाडी का लावली, ही आमची जागा आहे’ असे म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी बुक्क्यांनी व बेल्टने नाकावर मारल्याने फिर्यादीचे नाक फ्रॅक्चर झाले. पुढील तपास काळेवाडी पोलीस करीत आहेत.
—
पार्किंगच्या वादातून तरुणाला मारहाण
