.हातभट्टीची दारू विकणाऱ्यावर गुन्‍हा दाखल

पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – भोसरी येथील शांतीनगर परिसरात गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या एकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. १२ जून रोजी रात्री सव्वा नऊ वाजता शांतीनगर कॉलनी येथे ही कारवाई केली आहे.
शंकर जाधव (रा. शांतीनगर कॉलनी, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस अंमलदार वैभव पुरुषोत्तम वाटकर यांनी भोसरी पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली आहे.​ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा स्वतःच्या फायद्यासाठी प्लास्टिकच्या कॅनमध्ये ४५० रुपयांची ३ लिटर गावठी हातभट्टीची दारू विकत असताना मिळून आला. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *