पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) – आळंदी रस्त्यावरील देहूफाटा पीएमपीएमएल बसस्टॉपजवळ चालकाने अंगावर थुंकल्याचा जाब विचारल्याच्या रागातून दुचाकीस्वार दोन भावांना बस चालकाने दगडाने मारहाण केली. ही घटना ३ जुलै रोजी रात्री घडली.
नना सिताराम बारेला (वय ३२, रा. तळेगाव दाभाडे, मावळ) व इतर दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. स्वप्नील शिवाजी राठोड (वय २८, रा. आळंदी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जात असताना बस चालकाने त्यांच्या अंगावर थुंकले. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी बसस्टॉपवर गेले असता आरोपीने स्वप्नीलचे हेल्मेट हिसकावून घेतले आणि दोन्ही भावांना लाथाबुक्क्यांनी व रस्त्यावरील दगडाने डोक्यात मारून गंभीर जखमी केले व जिवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.
बस चालकाकडून तरुणाला दगडाने बेदम मारहाण!
