पिंपरी येथील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत विनापरवाना बेकायदेशीरपणे बिअरच्या बाटल्यांची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी छापा टाकला. ही कारवाई शनिवारी (११ जुलै) रात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास घडली.
या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल समीर ढवळे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिला आणि रोनित तिडेकर (२०, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे त्यांच्या ताब्यातील दोन हजार रुपये किमतीच्या बिअरच्या बाटल्यांची कोणतीही परवानगी नसताना बेकायदेशीर विक्री करत होते. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
