Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

मोशी दुर्घटनेनंतर पर्यावरण विभाग आणि कंत्राटदार कंपनीला कारणे दाखवा नोटीस नऊ जणांच्या मृत्यूनंतर प्रशासनाची कठोर भूमिका; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे चौकशीचे आदेश, जबाबदारांवर कारवाई अटळ

By Sumedh Chapalgaonkar
July 12, 2026 1 Min Read
0

पिंपरी-चिंचवड :
मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळून नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच महापालिकेच्या पर्यावरण विभागासह संबंधित कंत्राटदार कंपनी अँटोनी लारा रिन्युएबल्स यांना तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश देत निष्काळजीपणाला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.

दुर्घटनेनंतर रविवारी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीला अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सहआयुक्त मनोज लोणकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. दुर्घटनेची कारणे, सुरक्षा उपाययोजना, कचरा व्यवस्थापनाची अंमलबजावणी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

८ जुलै रोजी दुपारी मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळला. त्यावेळी इमारतीत आणि परिसरात एकूण २३ नागरिक होते. त्यापैकी पाच जण सुखरूप बाहेर पडले. त्यानंतर भारतीय सेना, एनडीआरएफ, पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल आणि पोलीस यंत्रणेने सलग ८४ तास संयुक्त बचावमोहीम राबवली. या मोहिमेत नऊ जणांना जीवदान मिळाले, तर नऊ जणांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला.

या दुर्घटनेमागे निष्काळजीपणा, सुरक्षा नियमांचे उल्लंघन किंवा व्यवस्थापनातील त्रुटी कारणीभूत होत्या का, याचा आता तपास केला जाणार आहे. चौकशी अहवालानंतर दोषींवर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता असून, या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाने जबाबदारी निश्चित करण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.

Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

निवासी इमारतीत बिअरची विक्री, तिघांवर गुन्हा

Next

Delhi-‘ऑपरेशन लोटस’वरून प्रियंका चतुर्वेदींचा भाजपवर हल्लाबोल; उमर अब्दुल्लांच्या दाव्याला पाठिंबा

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme