pimpri chinchwad crime-मॅक्झीन चौकात अश्लील हावभाव करणार्‍या दोन महिलेवर गुन्हा

पिंपरी, दि. 7 (pimpri chinchwad crime) – पुणे आळंदी रोडवरील मॅक्झीन चौकात सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करून अडथळा निर्माण करणार्‍या दोन महिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

ही कारवाई बुधवारी (दि. 6 मे) रोजी सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे.

याप्रकरणी दोन महिला आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अंमलदार सोमनाथ बाळु खळसोडे यांनी बुधवारी (दि. 6 मे) रोजी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे आळंदी रोडवरील मॅक्झीन चौकात दोन आरोपी महिला वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने येणार्‍या-जाणार्‍या लोकांना अडवून अश्लील हावभाव करत होत्या.

सार्वजनिक शिष्टाचाराचा भंग केल्याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून महिला पोलीस उपनिरीक्षक भोईर पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *