पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – दोन लाख रुपये किमतीच्या एकूण २० कॉपर कॉइल चोरी केल्याची घटना खेड तालुक्यातील वासुली येथील जी.ई. एरोस्पेस कंपनीत उघडकीस आली आहे. ही घटना २१ मे व ३१ मे रोजी घडली.
चंद्रशेखरराव सत्यनारायण सामासानी (वय ३६, रा. मोशी, मूळ रा. आंध्र प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. अब्दुल अहद अन्सारी (वय ३२ वर्षे, रा. आकुर्डी, पुणे, मूळ रा. हजारीबाग, झारखंड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कंपनीतून वेगवेगळ्या वजनाच्या ४५ किलो, ३८ किलो व ९ किलो अशा एकूण २० कॉपर कॉइल चोरून नेल्या. उत्तर महाळुंगे पोलीस पुढील तपास करीत आहेत
कंपनीतून २ लाखांच्या कॉपर कॉइलची चोरी
