वाळूचा ढिगारा काढण्यावरून दोन गटात हाणामारी

​पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – वाळूचा ढिगारा बाजूला घेण्याच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. ही घटना १९ जून रोजी खेड तालुक्यातील चिंबळी येथील बर्गेवस्ती भागात घडली. याप्रकरणी परस्‍पर विरोधी फिर्याद दाखल झाली आहे.
​संध्या अनिरूद्ध यादव (वय ३९, रा. मोशी) यांनी आळंदी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. विकास आत्माराम चौधरी (वय ३४) आणि सोनाली विकास चौधरी (वय ३१, दोघेही रा. चिंबळी) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या बांधकामाच्या साइटवर असताना आरोपी याने रस्त्यावरील वाळूचा ढिगारा काढण्यास सांगितले. त्यावरून झालेल्या वादात आरोपी विकास याने लाकडी फळीने फिर्यादीच्या कपाळावर प्रहार केला, तसेच तिचे पती अनिरूद्ध यादव यांनाही डोक्यात व पाठीवर मारहाण केली. आरोपीची पत्नी सोनाली हिनेही हाताने मारहाण व शिवीगाळ केली.
विकास आत्‍माराम चौधरी यांनी यांच्‍या परस्‍पर विरोधी फिर्याद दिली आहे. त्‍यानुसार फिर्यादी यांच्या पत्नी सोनाली या बांधकाम साईटवर गेल्या असताना रस्त्यावरील डस्ट हटवण्यावरून शेजारी राहणाऱ्या आरोपींनी वाद घातला. फिर्यादी तेथे सोडवण्यासाठी गेले असता आरोपी अनिरुध यादव आणि त्याची पत्नी संध्या अनिरुध यादव (दोघे रा. मोशी) यांनी फिर्यादीला हातातील काठीने छातीवर व हातावर मारहाण केली व धमक्या दिल्या. या दोन्‍ही गुन्‍ह्यांचा तपास आळंदी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *