कार घासल्याच्‍या कारणावरून कारची काच फोडली

​पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – कार घासल्याच्‍या कारणावरून एका कार चालकाला हातातील कड्याने मारहाण करून कारची काच फोडली. ही घटना म्हाळुंगे येथील स्पाईन रोड ते कृष्णानगर जाणाऱ्या रस्त्यावरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ १९ जून रोजी घडली.
शुभम संजय चोरमले (वय २६, रा. कृष्णानगर, चिखली) यांनी उत्‍तर महाळुंगे पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. हुंदाई आय-१० कार (क्र. MH 14 JW 7744) चालक आणि इतर दोघेजण यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चालकाने फिर्यादीच्या कारला घासून गाडी पुढे थांबवली. आरोपी आणि त्याच्या दोन मित्रांनी कारमधून उतरून फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच आरोपीच्या मित्राने हातातील कड्याने फिर्यादीच्या कारची समोरील काच फोडून नुकसान केले. तसेच फिर्यादीच्या नाकावर मारून दुखापत केली. उत्तर म्हाळुंगे पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *