भोसरी एमआयडीसीत साडेतीन लाखांच्या कंपनीच्या मालाचा अपहार
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – भोसरी एमआयडीसी येथील कोरस इंडिया लिमिटेड कंपनीत कुरुळी येथून मागवलेल्या स्क्रॅप मालापैकी सुमारे ३ लाख ६४ हजार रुपये किमतीच्या ७ मेट्रिक टन मालाचा परस्पर अपहार केला. ही घटना १४ जून रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली.
विकास मानिक लाटे (रा. देहूगाव, पुणे) आणि संतोष लाटे (रा. मोशी, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. अस्लम बशीर शेख (वय ४०, रा. अलमस मंजील, दत्तनगर, थेरगाव) यांनी सोमवारी (दि. १५ जून) रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींनी (एमएच १४ बीजे ३४२९) या ट्रकमध्ये कंपनीचा एकूण १० लाख ५८ हजार १२९ रुपये किमतीचा सीआरसीए स्क्रॅप माल आणला होता. मात्र, त्यापैकी फक्त १३ मेट्रिक टन माल खाली करून उर्वरित ७ मेट्रिक टन माल कंपनीत न उतरवता त्याचा परस्पर अपहार केला. याबाबत पुढील तपास उत्तर चाकण पोलीस करीत आहेत.