Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
राजकीय

रुपाली चाकणकरांच्या जागी वैशाली नागवडे? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या संघटनात्मक बदलांची तयारी; देवगिरीवरील बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा

By Team News Beez
June 16, 2026 2 Min Read
0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लवकरच मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता असून महिला प्रदेशाध्यक्षपदासह अनेक महत्त्वाच्या पदांवर नव्या नियुक्त्यांची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ निवासस्थानी सोमवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीत पक्षातील रिक्त पदे, फेरनियुक्त्या आणि संघटनात्मक पुनर्रचनेवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, पार्थ पवार आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. पक्ष संघटनेला अधिक बळकट करण्यासाठी विविध पदांवर नवीन चेहऱ्यांना संधी देण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणाऱ्या रुपाली चाकणकर यांच्या जागी आता नवीन नेतृत्वाची निवड होण्याची शक्यता आहे. पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी वैशाली नागवडे यांचे नाव आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

वैशाली नागवडे या सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या म्हणून कार्यरत आहेत. त्याआधी त्यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश सरचिटणीस अशी महत्त्वाची पदे सांभाळली आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली आहे.

नागवडे यांनी 2017 आणि 2020 च्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राहू-खामगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. संघटनात्मक काम, पक्षनिष्ठा आणि ग्रामीण भागातील सक्रिय संपर्क यामुळे त्यांचे नाव महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आले आहे.

विशेष म्हणजे 2022 मध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या पुण्यातील कार्यक्रमादरम्यान झालेल्या गोंधळात वैशाली नागवडे यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या प्रकरणात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. या घटनेनंतर त्यांचे नाव राज्यभर चर्चेत आले होते.

पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, महिला प्रदेशाध्यक्षपदाबरोबरच युवक आणि विद्यार्थी संघटनांमध्येही फेरबदल होण्याची शक्यता आहे. युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची नियुक्ती होऊ शकते, तर विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी आकाश झांबरे यांची निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि भविष्यातील राजकीय आव्हाने लक्षात घेऊन संघटनेत नवचैतन्य आणण्याच्या तयारीत असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पक्षाकडून अधिकृत नियुक्त्यांची घोषणा होण्याची शक्यता असून त्याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या महिला प्रदेशाध्यक्षपदावर अखेर कोणाची नियुक्ती होते, तसेच पक्षाच्या युवक आणि विद्यार्थी संघटनांची धुरा कोणाच्या खांद्यावर सोपवली जाते, याबाबतची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

Tags:

Vaishali Nagwade to replace Rupali Chakankar? Preparations underway for major organizational changes within the NCP; crucial discussions held at the 'Devgiri' meeting.
Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

सीएनजीचा पुन्हा झटका! वाहनचालकांच्या खिशाला आणखी कात्री

Next

भोसरी एमआयडीसीत साडेतीन लाखांच्‍या कंपनीच्या मालाचा अपहार

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme