पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – टॉवरच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने बांधकामाच्या ठिकाणी वाद घालून बांधकाम व्यावसायिकावर दगडाने मारहाण केली. ही घटना आळंदी येथे सोमवारी सकाळी घडली.
नौषाद सिकंदर पठाण (रा. आळंदी, ता. खेड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. रोहन नंदकुमार कुऱ्हाडे (वय ३७, रा. विठ्ठल रुक्मिणी चौक, आळंदी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदीतील भाजी मंडई शेजारी इंद्रायणी टॉवर “येथे काम करायचे नाही” असे म्हणून आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ केली. तिला समजून सांगत असताना तिने हातातील दगडाने मारहाण करून फिर्यादीच्या डाव्या हाताच्या करंगळीला व शेजारच्या बोटाला दुखापत केली. आळंदी पोलीस अधिक तपास करत आहेत.
बांधकाम व्यावसायिकाला महिलेकडून मारहाण
